महारुद्र कडाजी तिकुंडे
पुणे पदवीधर मतदारसंघ निवडणूक २०२६  |  अपक्ष उमेदवार

मी पदवीधर,मी आमदार

पदवीधरांच्या हक्कासाठी आता विधान परिषदेत आवाज हवा. महाराष्ट्रातील सुशिक्षित बेरोजगार युवकांच्या स्वावलंबन व स्वप्नपूर्तीसाठी २५ वर्षे शासनाच्या चुकीच्या धोरणांविरोधात संघर्ष करणारा योद्धा.

उमेदवाराला जाणून घ्या
  • २५+वर्षांचा सामाजिक संघर्ष
  • ८संघटनांचा पाठिंबा
  • ११संस्थांमध्ये जबाबदारी
  • २००२पासून माहिती अधिकार चळवळ

उमेदवाराची ओळख

सामान्य कुटुंबातून आलेले, शिक्षणातून विचारांची जडणघडण झालेले आणि सामाजिक प्रश्नांच्या माध्यमातून जनतेशी नाते निर्माण करणारे व्यक्तिमत्त्व — महारुद्र कडाजी तिकुंडे, साताऱ्याचे भूमिपुत्र.

प्रश्न विचारणे, माहिती मागणे, प्रशासनाला जाब विचारणे आणि कायद्याच्या चौकटीत राहून संघर्ष करणे, ही त्यांच्या कार्याची ठळक वैशिष्ट्ये आहेत.

नाव
मा. महारुद्र कडाजी तिकुंडे
जन्मतारीख
८ मे १९७२
उच्च माध्यमिक
छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा
पदवी
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर — १९९६

लढाई सत्तेची नाही, तर विचारांची; लढाई पदाची नाही, तर पदवीधरांच्या हक्काची!

संस्था व संघटनांमधील जबाबदाऱ्या

  • युवा राज्य फाउंडेशन, महाराष्ट्र
  • राष्ट्रीय सुशिक्षित बेरोजगार व स्वयंरोजगार संघटना
  • पंचम टेलिव्हिजन अँड ब्रॉडकास्टिंग नेटवर्क सहकारी संस्था, सातारा
  • अन्नपूर्णा चॅरिटेबल सोसायटी, सातारा
  • अन्नपूर्णा स्वयंरोजगार सहकारी सेवा संस्था, सातारा
  • अनुराधा पब्लिकेशन सहकारी संस्था, सातारा
  • सातारा ट्रेकिंग असोसिएशन
  • माहिती अधिकार प्रचार व प्रसार संघ
  • पोलीस हक्क बचाव समिती
  • युनिव्हर्सल ट्रेकिंग अँड ट्रेनिंग अकॅडमी, सातारा
  • गुरुदत्त सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय, सातारा

पदवीधरांचे प्रश्न, विधान परिषदेत ठाम आवाज

हे प्रश्न केवळ निवडणुकीपुरते नव्हेत; शासन व प्रशासनाच्या पातळीवर त्यांचा सातत्याने पाठपुरावा व्हायला हवा.

  • रोजगार व बेरोजगारीशासकीय भरती, रखडलेल्या प्रक्रिया आणि मर्यादित संधी
  • स्वयंरोजगारउद्योग-व्यवसायासाठी मार्गदर्शन व संधी
  • स्पर्धा परीक्षातयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अडचणी
  • शिक्षणशैक्षणिक संधी आणि वाढता खर्च
  • कौशल्यविकासप्रशिक्षणाच्या संधी आणि खासगी क्षेत्रातील वाव
  • पारदर्शक प्रशासनमाहितीचा अधिकार, उत्तरदायित्व आणि पाठपुरावा

पदवीधरांसाठी उपलब्ध विकास निधीचा उपयोग त्यांच्या शिक्षण, रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या प्रश्नांसाठी कितपत झाला — हा प्रश्न आज प्रत्येक पदवीधराने विचारण्याची गरज आहे.

२५ वर्षांचा अविरत प्रवास

आंदोलने, मोर्चे, धरणे, निवेदने, शासन-प्रशासनाशी पत्रव्यवहार आणि जनजागृती — लोकशाही व कायदेशीर मार्गाने सातत्याने केलेला संघर्ष.

मत मागणारे नव्हे, प्रश्न घेऊन विधान परिषदेत लढणारे नेतृत्व निवडा!

  1. २००२

    माहिती अधिकार चळवळ

    आजअखेर सुरू. नागरिकांना हक्कांची जाणीव, प्रशासनात पारदर्शकता व उत्तरदायित्व, आणि अन्याय व अनियमिततेविरोधात कायदेशीर लढा.

  2. २००५

    राष्ट्रीय सुशिक्षित बेरोजगार संघटना

    बेरोजगार युवक-युवतींच्या न्याय्य हक्कांसाठी व रोजगार, शासकीय भरती, स्वयंरोजगार व प्रशिक्षणाच्या प्रश्नांसाठी स्थापना.

  3. २००९

    युवा राज्य फाउंडेशन

    वंचित, दुर्बल, युवक, महिला आणि विविध सामाजिक घटकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी स्थापना.

व्हिडिओ

व्हिडिओ १

व्हिडिओ २

व्हिडिओ ३

व्हिडिओ ४

व्हिडिओ ५

व्हिडिओ ६

व्हिडिओ ७

व्हिडिओ ८

व्हिडिओ ९

व्हिडिओ १०

व्हिडिओ ११

व्हिडिओ १२

व्हिडिओ १३

व्हिडिओ १४

व्हिडिओ १५

व्हिडिओ १६

पश्चिम महाराष्ट्रातील संघटनांचा पाठिंबा

  • ह्युमन वेल्फेजर असोसिएशन
  • हॅकर संघटना
  • राष्ट्रीय सुशिक्षित बेरोजगार व स्वयंरोजगार संघटना
  • माहिती अधिकार प्रचार व प्रसार संघ
  • पोलीस हक्क बचाव समिती तथा पत्रकार हक्क संरक्षण कमिटी
  • बहुउद्देशीय संघटना
  • सेवाशक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघटना, सातारा विभाग
  • ग्राहक संरक्षण परिषद समिती, सांगली

त्यांच्याबद्दल काय म्हणतात

१३ मान्यवरांचे मनोगत — संपूर्ण मजकूर वाचण्यासाठी “पुढे वाचा” दाबा.

प्रतिनिधी : रोजगार, बेरोजगारी, स्पर्धा परीक्षा, शिक्षणाच्या संधी आणि प्रशासनाशी संबंधित प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर पदवीधर मतदारसंघाची निवडणूक चर्चेत आली आहे. या प्रश्नांवर उमेदवारांची भूमिका काय आहे, त्यांचा सार्वजनिक कामाचा अनुभव आणि भविष्यातील कार्यक्रम काय आहे, याकडे पदवीधर मतदारांचे लक्ष लागले आहे. या पार्श्वभूमीवर महारुद्र कडाजी तिकुंडे यांच्यासह निवडणुकीतील विविध उमेदवारांच्या भूमिकांची चर्चा सुरू झाली आहे.
मोहन शिंदेमोहन शिंदेशुभचिंतक

समाजातील प्रश्नांना सातत्याने वाचा फोडणारा कार्यकर्ता म्हणजे महारुद्र कडाजी तिकुंडे

पुणे पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार माननीय श्री. महारुद्र कडाजी तिकुंडे यांच्याबाबत मत व्यक्त करताना दीप लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्टच्या संस्थापिका सौ. लक्ष्मी कैलास कुंभार म्हणाल्या की, समाजातील विविध प्रश्न, सामान्य नागरिकांचे प्रश्न आणि सामाजिक विषय याबाबत सातत्याने भूमिका मांडणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये महारुद्र तिकुंडे यांचा उल्लेख करता येतो.
सौ. लक्ष्मी कैलास कुंभारसौ. लक्ष्मी कैलास कुंभारसंस्थापिका, दीप लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट

पदवीधरांच्या प्रश्नांना केवळ आश्वासन नव्हे, तर सातत्याने आवाज देणारा प्रतिनिधी आवश्यक

सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी पुणे पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार मा.महारुद्र कडाजी तिकुंडे यांच्याबाबत आपले मत व्यक्त करताना सांगितले की, पदवीधर मतदारसंघाची निवडणूक ही केवळ एका व्यक्तीच्या निवडीची प्रक्रिया नसून शिक्षित तरुण, बेरोजगार पदवीधर, कर्मचारी, स्वयंरोजगार करणारे युवक आणि समाजातील विविध घटकांच्या प्रश्नांना विधान परिषदेत प्रभावीपणे मांडण्याची संधी आहे.
सुशांत मोरेसुशांत मोरेसामाजिक कार्यकर्ते
पुणे पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार श्री. महारुद्र कडाजी तिकुंडे यांच्याविषयी मत मांडताना व्यक्तीपेक्षा त्यांच्या सार्वजनिक कामाचा, सामाजिक भूमिकेचा आणि पदवीधर मतदारांच्या प्रश्नांबाबतच्या भूमिकेचा वस्तुनिष्ठ विचार होणे आवश्यक आहे.
कैलास कुंभारकैलास कुंभारपत्रकार

पदवीधरांचा आवाज कोण बुलंद करणार? प्रश्न व्यक्तीचा नव्हे, भूमिकेचा!

पदवीधर मतदारसंघाची निवडणूक म्हणजे केवळ उमेदवारांच्या नावांची किंवा प्रचाराच्या गाजावाजाची लढाई नव्हे; ती सुशिक्षित समाजाच्या अपेक्षा, तरुणांच्या भवितव्याचे प्रश्न आणि लोकप्रतिनिधीच्या उत्तरदायित्वाची कसोटी असते. त्यामुळे श्री. महारुद्र कडाजी तिकुंडे यांच्याकडे पाहतानाही व्यक्तीपेक्षा त्यांच्या सार्वजनिक भूमिकेचा आणि पदवीधरांच्या प्रश्नांवरील दृष्टिकोनाचा विचार होणे आवश्यक आहे.
शिवाजी जाधवशिवाजी जाधवशुभचिंतक

पदवीधरांचा आवाज कोण बुलंद करणार? प्रश्न व्यक्तीचा नव्हे, भूमिकेचा!

पदवीधर मतदारसंघाची निवडणूक म्हणजे केवळ उमेदवारांच्या नावांची किंवा प्रचाराच्या गाजावाजाची लढाई नव्हे; ती सुशिक्षित समाजाच्या अपेक्षा, तरुणांच्या भवितव्याचे प्रश्न आणि लोकप्रतिनिधीच्या उत्तरदायित्वाची कसोटी असते. त्यामुळे श्री. महारुद्र कडाजी तिकुंडे यांच्याकडे पाहतानाही व्यक्तीपेक्षा त्यांच्या सार्वजनिक भूमिकेचा आणि पदवीधरांच्या प्रश्नांवरील दृष्टिकोनाचा विचार होणे आवश्यक आहे.
अनिल जाधवअनिल जाधवराज्य संघटक, संभाजी ब्रिगेड

जनसामान्यांसाठी धडपडणारे नेतृत्व – महारुद्र तिकुंडे सर

समाजातील सामान्य माणसाच्या अडचणी समजून घेऊन त्यांच्यासाठी सातत्याने धडपडणारे व्यक्तिमत्त्व म्हणून महारुद्र तिकुंडे सर यांची ओळख निर्माण झाली आहे. माहितीच्या अधिकाराखाली समाजातिल लोकांना त्यांनी निस्वार्थीपणे न्याय मिळवून दिला. सामाजिक बांधिलकी जपत विविध समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून त्यांनी आपले कार्य सुरू ठेवले आहे.
राजेंद्र मोहिते (आबा)राजेंद्र मोहिते (आबा)तळबीड, ता. कराड
मा. श्री. महारुद्र कडाजी तिकुंडे सर हे सातारचे भूमिपुत्र असून सामाजिक कार्याची आवड असलेले एक धडाडीचे नेतृत्व आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ते माहिती अधिकार क्षेत्रातून आणि सामाजिक कार्याच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी प्रयत्नशील आहेत. समाजातील अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे आणि नागरिकांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देणे हे त्यांच्या कार्याचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. तरुण, विद्यार्थी, सुशिक्षित बेरोजगार आणि पदवीधरांच्या प्रश्नांबाबत त्यांना विशेष आस्था आहे. रोजगार, शिक्षण आणि पारदर्शक प्रशासन या विषयांवर काम करण्याचा त्यांचा संकल्प आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ते प्रयत्न करतात. पुणे विभाग पदवीधर मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून त्यांनी निवडणुकीच्या मैदानात प्रवेश केला आहे. पदवीधरांचे प्रश्न विधानपरिषदेत मांडून त्यांच्या हक्कांसाठी प्रभावीपणे लढण्याचा त्यांचा निर्धार आहे. समाजहिताला प्राधान्य देत लोकशाहीच्या माध्यमातून सकारात्मक बदल घडवून आणण्याची त्यांची भूमिका आहे. सातारचा भूमिपुत्र म्हणून महारुद्र कडाजी तिकुंडे सर यांच्याकडून पदवीधरांना आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या अपेक्षा आहेत.
इम्रान मुल्लाइम्रान मुल्लाप्रदेशाध्यक्ष, राष्ट्रीय सुशिक्षित बेरोजगार व स्वयंरोजगार संघटना, महाराष्ट्र राज्य

महारुद्र तिकुंडे सर : सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी लढणारे नेतृत्व

समाजामध्ये अनेक लोक काम करत असतात; परंतु सामान्य माणसाच्या अडचणी समजून घेऊन त्यावर आवाज उठवणारी माणसे वेगळी असतात. मा. श्री. महारुद्र कडाजी तिकुंडे सर हे माहिती अधिकार आणि सामाजिक कार्याच्या माध्यमातून लोकांचे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न करणारे नेतृत्व आहे. समाजातील विविध प्रश्नांबाबत जागरूकता निर्माण करणे आणि नागरिकांना त्यांच्या अधिकारांची जाणीव करून देणे, हे त्यांच्या कार्याचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. आज पदवीधर तरुणांसमोर रोजगार, शिक्षण आणि स्पर्धा परीक्षांसारखे अनेक प्रश्न आहेत. या प्रश्नांना योग्य व्यासपीठ मिळणे गरजेचे आहे. पुणे विभाग पदवीधर मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून उभे राहिलेले तिकुंडे सर पदवीधरांचे प्रश्न मांडण्याची भूमिका घेऊन निवडणुकीत उतरले आहेत. सर्व पदवीधर मतदारांनी उमेदवारांचे कार्य आणि विचार तपासून मतदान करावे. आपल्या प्रश्नांना महत्त्व देणाऱ्या नेतृत्वाला संधी देणे ही काळाची गरज आहे.
राजअहमद मुल्लाराजअहमद मुल्लासोलापूर जिल्हाध्यक्ष, राष्ट्रीय सुशिक्षित बेरोजगार व स्वयंरोजगार संघटना

आपल्यातील एक माणूस विधानपरिषदेत जाण्यासाठी प्रयत्नशील!

आपण सर्वसामान्य माणसे रोज अनेक समस्यांना सामोरे जात असतो. शिक्षण पूर्ण करूनही नोकरी मिळत नाही, स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अनेक अडचणी येतात आणि पदवीधरांचे प्रश्न अनेकदा दुर्लक्षित राहतात. अशा परिस्थितीत आपल्या समस्या समजून घेणारा प्रतिनिधी असणे महत्त्वाचे आहे. महारुद्र कडाजी तिकुंडे सर यांनी पुणे विभाग पदवीधर मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. माहिती अधिकार क्षेत्रातील त्यांचा अनुभव आणि सामाजिक प्रश्नांबाबतची त्यांची भूमिका यामुळे त्यांची उमेदवारी चर्चेचा विषय ठरत आहे. पदवीधरांनी मतदान करताना आपले प्रश्न कोण मांडणार, याचा विचार करावा. केवळ ओळख किंवा प्रसिद्धी न पाहता उमेदवाराची भूमिका आणि काम करण्याची तयारी पाहावी. माझे सर्व पदवीधर बांधव आणि भगिनींना आवाहन आहे की, मतदानाचा हक्क नक्की बजावा आणि आपल्या भविष्याचा विचार करून योग्य निर्णय घ्या.
विजय मोहन शिंदेविजय मोहन शिंदेयुवा उद्योजक

तरुणांच्या भविष्याचा प्रश्न आणि पदवीधरांची निवडणूक

आजचा तरुण शिकतो, मेहनत करतो, स्पर्धा परीक्षांची तयारी करतो; पण त्याला आपल्या शिक्षणानुसार संधी मिळेलच याची खात्री नसते. त्यामुळे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीकडे केवळ राजकीय निवडणूक म्हणून न पाहता तरुणांच्या भविष्याशी संबंधित संधी म्हणून पाहिले पाहिजे. महारुद्र कडाजी तिकुंडे सर यांनी पुणे विभाग पदवीधर मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी दाखल करून पदवीधरांचे प्रश्न मांडण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. रोजगार, गुणवत्तापूर्ण शिक्षण, स्पर्धा परीक्षांमधील पारदर्शकता आणि सुशिक्षित बेरोजगारांच्या अडचणी या विषयांवर चर्चा होणे आवश्यक आहे. पदवीधरांचा आवाज निर्णयप्रक्रियेपर्यंत पोहोचला पाहिजे. म्हणूनच प्रत्येक पदवीधर मतदाराने जागरूक राहून उमेदवारांचे विचार आणि प्राधान्यक्रम समजून घ्यावेत. आपल्या एका मताची किंमत ओळखा, मतदानापासून दूर राहू नका आणि आपल्या भविष्याशी संबंधित निर्णयात सक्रिय सहभाग घ्या.
प्रशांत जगन्नाथ जाधवप्रशांत जगन्नाथ जाधवसातारा जिल्हाध्यक्ष, युवा राज्य फौंडेशन महाराष्ट्र राज्य

पदवीधरांच्या प्रश्नांना मिळावे हक्काचे व्यासपीठ

लोकशाहीमध्ये प्रत्येक निवडणुकीला एक वेगळे महत्त्व असते. पदवीधर मतदारसंघाची निवडणूक ही सुशिक्षित वर्गाच्या समस्या आणि अपेक्षा मांडण्याची महत्त्वाची संधी आहे. आज शिक्षणाचा प्रसार वाढला असला, तरी अनेक तरुणांना रोजगारासाठी संघर्ष करावा लागत आहे. शिक्षण पूर्ण केल्यानंतरही योग्य संधी न मिळणे, स्पर्धा परीक्षांमधील अडचणी आणि नोकरीच्या अनिश्चिततेमुळे तरुण चिंतेत आहेत. या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवणाऱ्या नेतृत्वाची गरज आहे. महारुद्र कडाजी तिकुंडे सर यांनी माहिती अधिकाराच्या क्षेत्रात आणि सामाजिक कार्यातून लोकांचे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला आहे. पुणे विभाग पदवीधर मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी दाखल करून त्यांनी पदवीधरांच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याची भूमिका घेतली आहे. मतदारांनी कोणत्याही निर्णयापूर्वी उमेदवाराचे कार्य, विचार आणि भविष्यातील भूमिका समजून घ्यावी. प्रत्येक पदवीधराने मतदानाचा हक्क बजावून लोकशाही बळकट करण्यासाठी आपले योगदान द्यावे, हीच अपेक्षा आहे.
हनुमंत शंकर शिंदेहनुमंत शंकर शिंदेमार्गदर्शक, युवाराज्य फौंडेशन महाराष्ट्र राज्य

आता पदवीधरांच्या प्रश्नांवर ठोस चर्चा होण्याची गरज!

पदवी मिळवणे हे प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील महत्त्वाचे यश असते; परंतु पदवी मिळाल्यानंतर रोजगार, आर्थिक स्थैर्य आणि योग्य संधी मिळवण्यासाठी अनेक तरुणांना मोठा संघर्ष करावा लागतो. या परिस्थितीत पदवीधरांचे प्रश्न केवळ चर्चेपुरते मर्यादित न राहता ते योग्य ठिकाणी मांडले जाणे आवश्यक आहे. महारुद्र कडाजी तिकुंडे सर यांनी पुणे विभाग पदवीधर मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी दाखल केली असून पदवीधरांच्या प्रश्नांना आवाज देण्याची अपेक्षा त्यांच्याकडून व्यक्त केली जात आहे. शिक्षणव्यवस्थेतील अडचणी, बेरोजगारी, स्पर्धा परीक्षांबाबतचे प्रश्न आणि सुशिक्षित तरुणांना मिळणाऱ्या संधी या विषयांवर प्रभावीपणे काम होणे गरजेचे आहे. निवडणूक ही केवळ मतदानाची प्रक्रिया नसून आपल्या अपेक्षा व्यक्त करण्याची संधीदेखील आहे. म्हणून सर्व पदवीधर मतदारांनी उमेदवारांची माहिती घ्यावी, त्यांच्या भूमिका तपासाव्यात आणि जबाबदारीने मतदान करावे. आपल्या मतातून पदवीधरांच्या प्रश्नांना प्राधान्य देणाऱ्या नेतृत्वाला संधी मिळू शकते.
मोहन जगन्नाथ जाधवमोहन जगन्नाथ जाधवसातारा तालुका अध्यक्ष, युवाराज्य फौंडेशन महाराष्ट्र राज्य

पदवी घेतली म्हणजे शिक्षण पूर्ण झाले असे नाही

आपल्या हक्कांसाठी आवाज उठवला, तरच त्या शिक्षणाला खरा अर्थ प्राप्त होतो. पदवीधर जागा झाला, तर प्रश्न विचारण्याची ताकद निर्माण होते.

उमेदवाराचे कार्य, विचार, सामाजिक बांधिलकी आणि जनतेशी असलेला प्रत्यक्ष संपर्क पाहून, कोणत्याही दबावाशिवाय स्वतंत्रपणे मतदान करा.

  • मत विकायचे नाही.
  • दबावाला झुकायचे नाही.
  • खोट्या आश्वासनांना भुलायचे नाही.
  • जागरूक व्हा
  • प्रश्न विचारा
  • माहिती तपासा
  • मतदान करा